शिक्षक आणि विद्यार्थी -साईन अप
लर्निंग नॅव्हीगेटर वर आपण शिक्षक किंवा अध्ययनार्थी / विद्यार्थी म्हणून खाते सुरु करू शकतो. नॅव्हीगेटरच्या वेगवगेळ्या लिंक्सनुसार या प्रक्रियेत थोडे फार बदल असू शकतात.
खाली दिलेल्या पायऱ्या या gooru.org आणि demo.gooru.org यावर खाते तयार करण्यासाठी आवश्यक आहेत. टेनंट लिंक वर (उदा: tl.gooru.org/in-mh) खाते तयार करण्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या भागातील संबंधित संस्था / अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.
आपण लर्निंग नॅव्हीगेटर वर शिक्षक म्हणून साईन अप कसे करावे हे पाहणार आहोत.
पायरी | चित्र |
गुरु च्या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईन अपचे बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे. | |
साईन अपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लर्निंग नॅव्हीगेटर मध्ये जोडले जाण्यासाठी जी सामान्य माहिती आवश्यक आहे ती भरण्याचा फॉर्म दिसतो . आपले नाव, आडनाव, इमेल, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा. आपण सध्या वापरत असलेला इमेल आय डी इथे भरावा. वेबसाईट वर दिल्याप्रमाणे जन्मतारीख लिहिताना महिना, तारीख आणि वर्ष या पद्धतीने भरावे | |
यानंतर आपले युझर नेम तयार करावे- जे वापरून तुम्ही नंतर लॉगीन करणार आहात. पासवर्ड तयार करून घ्यावा. पासवर्ड असा टाकावा जो तुमच्या लक्षात राहील आणि वारंवार टाकता येईल. पासवर्ड पुन्हा टाकून ‘Next’ वर क्लिक करावे. | |
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेजारी दाखवलेला संदेश स्क्रीन वर दिसेल. त्यात दिलेल्या सूचनेनुसार Gooru कडून आपल्याला इमेल येईल.त्यातील लिंकचा वापर करून आपल्या खात्याची वैधता सिद्ध करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार कृती करावी. | |
आपण शिक्षक म्हणून लॉगीन करणार असाल तर . Country मध्ये इंडिया निवडा व ‘Next’ वर क्लिक करावे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर साईन अपची प्रक्रिया इथपर्यंत सारखीच आहे. इथून पुढील प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी साईन अप प्रक्रिया समजून घ्या . | |
पुढील पानावर क्लासरूम तयार करण्याविषयी माहिती आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या वर्गाचे नाव तयार करायचे आहे. उदाहरणार्थ- मी जर इयत्ता दुसरीला मराठी शिकवत असेन तर मी माझ्या क्लासरूम चे नाव ‘शाळेचे नाव-मराठी-इयत्ता २री’ असे ठेवीन. | |
जेव्हा तुम्हाला पुढील पान दिसेल- तिथे तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील, तेव्हा तुमची साईन अपची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजावे. |
जर तुम्ही विद्यार्थी म्हणून साईन अप करत असाल तर-
पायरी | चित्र |
गुरु च्या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईन अपचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करावे. | |
तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लर्निंग नॅव्हीगेटर मध्ये जोडले जाण्यासाठी जी सामान्य माहिती आवश्यक आहे ती भरण्याचा फोर्म दिसेल. याठिकाणी आपले नाव, आडनाव, इमेल, जन्मतारीख इत्यादी माहिती भरा. वेबसाईट वर दिल्याप्रमाणे जन्मतारीख लिहिताना महिना, तारीख आणि वर्ष या पद्धतीने भरावे. | |
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेजारी दाखवलेला संदेश स्क्रीन वर दिसेल. त्यात दिलेल्या सूचनेनुसार Gooru कडून आपल्याला इमेल येईल.त्यातील लिंकचा वापर करून आपल्या खात्याची वैधता सिद्ध करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार कृती करावी. | |
आपण शिक्षक म्हणून लॉगीन करणार असाल तर . Country मध्ये इंडिया निवडा व ‘Next’ वर क्लिक करावे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर साईन अपची प्रक्रिया इथपर्यंत सारखीच आहे. इथून पुढील प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी साईन अप प्रक्रिया समजून घ्या . | |
पुढील पानावर वर्गाला जोडण्याविषयी माहिती आहे. जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांकारून वर्गाचा संकेतांक (Code) मिळाला असेल तर तो क्रमांक या ठिकाणी टाका. नसेल तर ‘Not now’ वर क्लिक करावे. | |
जेव्हा तुम्हाला पुढील पान दिसेल तेव्हा तुम्ही साईन अपची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून एक कोड मिळेल. तो टाकल्यावर तुम्ही त्या वर्गाशी जोडले जाल. |
0 Comments