Skip to content Skip to main navigation Skip to footer

वर्ग नियोजन

Table of Contents

वर्ग प्रक्रियेत वर्ग नियोजनाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. वर्गातील प्रत्येक मुल जिथे आहे तिथून अपेक्षित पातळी पर्यंत नेण्यासाठी नियोजन करणे त्यामुळेच आवश्यक असते. मुल निहाय नियोजन करताना  प्रत्येक मुल अध्ययन वाटचालीवर कुठे आहे आणि त्यांना अंतिम अपेक्षित पातळीवर नेण्यासाठी  आवश्यक ते अध्ययन अनुभव देण्यासाठी नियोजन गरजेचे असते. 

खालील गोष्टी उपलब्ध असल्यास नियोजन अधिक प्रभावी होऊ शकते:

१. मुल निहाय अध्ययन पातळीची माहिती    

२. मुलांच्या क्षमतेनिहाय संसाधने 

३. नियोजनाच्या नोंदी 

लर्निंग नव्हीगेटरवरील वर्ग नियोजनाच्या पानावर आपल्याला या गोष्टी फीचर्सच्या स्वरुपात उपलब्ध आहेत.

खाली वर्ग नियोजनाच्या पानाचा स्क्रीनशॉट दिला आहे.

या पानावर दिसणाऱ्या गोष्टी एकेक करून आपण समजून घेऊया.

Assign an Activity

  • नियोजनासाठी आवश्यक संसाधने आणि मूल्यमापने इथे शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत.
  • ही संसाधने इयत्ता, अध्ययन क्षेत्र, घटक आणि क्षमता यानुसार मांडणी करून दिलेली आहेत 
  • वर्गातील प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र किंवा समान/मिश्र क्षमतेच्या गटांसाठी आवश्यक ती संसाधने इथून आपल्या नियोजनात जोडता येतात.
  • लर्निंग नॅव्हीगेटरवर ४ प्रकारच्या लायब्ररीमधून संसाधने शोधण्याची , पाहण्याची, वापरण्याची सोय उपलब्ध आहे. खालील स्क्रीनशॉट मध्ये पिवळ्या रंगानेरंगवलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक केले असता हा ‘फिल्टर’चा पर्याय आपल्यासाठी खूला होतो. उपलब्ध ४ लायब्ररीजपैकी ज्यातील संसाधने आपल्याला पहायची आहेत ती वगळता इतर सर्व पर्याय ‘close’ करून क्षमता निहाय संसाधने आपल्याला शोधता येतात.

दैनंदिन/ साप्ताहिक/मासिक नियोजन

  • मुलांच्या अध्ययन वाटचाली नुसार नियोजनात जोडलेले संसाधन संग्रह, मूल्यमापन आपल्याला डावीकडे पाहता येते.
  • प्रत्येक संग्रहाचे किंवा मूल्यमापनाचे खालील प्रमाणे कार्ड आपल्याला इथे दिसते
  1. आपल्याकडे असणाऱ्या वर्गातील किंवा बहुवर्गातील मुलांसाठी इथे अध्ययन अनुभव नेमून देता येतात.
  2. मूल्यमापन घेतल्यानंतर ‘स्काय लाईन’ मध्ये मुलांची प्रभुत्व पातळी दिसावी की नाही याचा निर्णय इथे घेता येतो.
  3. मुलांसोबत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ नियोजित करता येते.
  4. नियोजनात जोडलेले संसाधन संग्रह , मूल्यमापन मुलांना त्यांच्या लॉग इन वर पाहता यावे यासाठी ‘Activate’ करता येते.

या टॅबमुळे माहिती संकलन, संसाधने आणि मूल्यमापन तसेच नियोजनाच्या नोंदी करणे अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या लिखाणाचे काम आपल्याला करावे लागत नाही.थोडक्यात मुल निहाय अध्ययनपातळीची माहिती, मुल आणि क्षमता निहाय नियोजनासाठी आवश्यक संसाधने यांच्या सहाय्याने प्रभावी नियोजन करण्यासाठी वर्ग नियोजनाच्या या पानाचा उपयोग आपल्याला होतो.  

Was This Article Helpful?

0 Comments

There are no comments yet

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *