लर्निंग नॅव्हीगेटरवर अध्ययन साहित्य शोधणे
Table of Contents
मुल निहाय प्रगती पाहणे आणि मुलनिहाय नियोजन करणे हे प्रत्येक मुल आपापल्या क्षमतेनुसार शिकावे आणि अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचावे यासाठी अत्यंत गरजेचे असते हे नक्कीच. शिक्षक म्हणून या संदर्भात अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. जसे की :
१. माझ्या वर्गात ४० मुले आहेत यांच्यासाठी वेगवगळे नियोजन करताना अगदी क्षमता निहाय आणि वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव देणारे अध्ययन साहित्य कसे तयार करावे?
२. विविध पुस्तके , इंटरनेट च्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी एका विशिष्ट विषयातील उदा: इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील अमुक एका क्षमतेसाठी , अध्ययन निष्पत्तिसाठी संसाधने शोधण्यात किती वेळ घालवावा? या संसाधनांची विश्वासाहर्यता काय?
३. कोणते संसाधन कोणत्या मुलांना कोणत्या टप्प्यावर उपयुक्त आहे हे कसे कळणार?
हे किंवा असे अनेक इतर प्रश्न शिक्षक म्हणून आपल्या समोर उभे राहतात.
शिक्षकांना या संदर्भात मदत व्हावी यासाठी नॅव्हीगेटरवर क्षमता निहाय अध्ययन साहित्य उपलब्ध करून दिलेले असते. हे साहित्य संसाधन संगार्ह, मूल्यमापन आणि कृतियुक्त अध्ययन अनुभव या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. शिक्षकांना आणि मुलांना त्यांच्या लॉग इन वरून / खाते वापरून हे साहित्य वापरता येते.
हे साहित्य शिक्षक खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी पाहू तसेच वापरू शकतात.
१. वर्ग नियोजनाचे पान (Class Activities)
आपल्या वर्गातील वर्ग नियोजनाच्या पानावर ‘Assign an Activity’ या शीर्षकाखाली आपल्याला प्रत्येक क्षमतेसाठी उपलब्ध असणारे मूल्यमापन, संसाधन संग्रह, कृतियुक्त अध्ययन अनुभव पाहता येते.
डेस्कटाॅप वर हे चित्र आपल्याला खालील प्रमाणे दिसेल.
मोबाईलवर ही संसाधने पाहण्यासाठी खालील प्रमाणे ‘Assign an Activity’वर क्लिक करून हे अध्ययन साहित्य पाहता येते.
नॅव्हीगेटरवर संसाधने ही ४ लायब्ररीमध्ये विभागलेली आहेत.
1. Course map
2. Navigated learning schools
3. My Content
4. Gooru Catalog
या पैकी कोणत्याही ठराविक लायब्ररीमधील अध्ययन साहित्य आपल्याला पाहायचे , वाचायचे, वापरायचे असल्यास त्यासाठी ‘फिल्टर’ लावण्याची सुविधाही याच पानावर उपलब्ध आहे.
खालील स्क्रीनशॉट पहा:
या आडव्या तीन रेषांवर क्लिक केले असता खालील सर्व पर्याय उपलब्ध होतात.
त्यातून आपल्याला नको असणाऱ्या लायब्ररीजचा पर्याय घालवण्यासाठी ‘x’ वर क्लिक करून ठराविक एका लायब्ररी मधील साहित्य आपल्याला पाहता येते.
वर्ग नियोजनाच्या पानावर आपल्याला चारही लायब्ररींमधील संसाधने निवडता, पाहता येतात, नियोजनात जोडता येतात. आपल्या वर्गाला जोडलेला इयत्ता आणि विषयानुसार असा अभ्यासक्रम पाहण्यासाठी आपण ‘Learning Journey’ या टॅबचा वापर करू करता येतो.
२. अध्ययन वाटचाल (Learning Journey)
नॅव्हीगेटरवर तयार केलेल्या प्रत्येक वर्गाला संयुक्तिक असा अभ्यासक्रम जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम क्षमतांच्या संरचनेवर आधारित तयार केलेला असतो. क्षमता, अध्ययन निष्पत्ती याच सोबत ‘शिकण्याची तत्वे’ (Principles of Learning) यांचा विचार करून या अभ्यासक्रमातील संसाधने तयार केलेली असतात. ‘अध्ययन वाटचाल’ या पानावर ‘Show Course map’ यावर क्लिक करून ही संसाधने विषयातील अध्ययन क्षेत्र निहाय पाहता येतात.
खालील स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला इयत्ता तिसरी गणिताच्या अभ्यासक्रमातील अध्ययन क्षेत्रे आणि त्यातील क्षमता निहाय पाठ (Lessons) दिसत आहेत.
३. लायब्ररी (Library)
आपल्या वर्गाचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी आपण जसे अध्ययन वाटचाल येथील ‘Course Map’ या पर्यायाचा वापर करू शकतो तसेच ‘My Content’ आणि ‘Gooru Catalog’ येथील अध्ययन साहित्य पाहण्यासाठी आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या होम पेज वरील ‘लायब्ररी’ इथे क्लिक करून त्यातील साहित्य पाहू शकता.
खालील स्क्रीनशॉट पहा.
लायब्ररी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रकारे २ कार्ड्स दिसतील.
इथे आपण ‘My content’ आणि ‘Gooru Catalog’ मधील उपलब्ध साहित्य आपण पाहू शकता.
0 Comments