क्षमतांची संरचना
Table of Contents
क्षमता म्हणजे काय?
पारंपारिक वर्ग पद्धतीत मुलांच्या शिकण्याचा विचार कसा केला आहे ते पाहणे आधी, गरजेचे वाटते. यामध्ये मुलांचा पाठ्यक्रम पूर्ण झाला म्हणजे मुले शिकली किंवा ठराविक कालावधी नंतर परीक्षा घेवून मुलांना टक्केवारी प्राप्त झाली म्हणजे मुले शिकली आहे. परंतु मुल शिकल म्हणजे मुलाने जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा कोणत्या क्षमता प्राप्त केल्या आहेत याचा विचार करणे आवश्यक आहेत. मुलाला क्षमता प्राप्त होण हा मुलांच्या शिक्षणाचा मुख्य हेतू आहे, असे आपण मानतो तर मुलाच्या शिकण्याचा वेगळ्या पद्धतीने विचार होणे आवश्यक आहे. मुलाला गणित, भाषा, तसेच इतर विषयांच्या क्षमता शिकायच्या आहेत तर पाठ्यपुस्तकावरून क्षमताकडे येणे गरजेचे वाटते. क्षमता म्हणजे काय तर अशी विधान की “मुल ज्याच्यातून नेमक काय शिकल हे पाहता येईल, आणि त्यानुसार मुलाला मदत करता येईल”
क्षमता आधारित शिक्षणाची संरचना
क्षमता आधारित शिक्षण हे मुलाची कौशल्ये विकसित करण्यावर भर देते. शिकण्याचा मुख्य हेतूच हा आहे की, मुल जी कौशल्ये शिकत आहे त्याचा जीवन जगताना ते कसा वापर करू शकेल आणि याच मुख्य हेतूवर क्षमता आधारित शिक्षणात लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिकण्याच्या प्रक्रियेत मुल नेमकेपणाने कुठे आहे, हे शिक्षकाला समजेल आणि त्यानुसार मुलाला मदत केली जाईल. लर्निंग नेव्हिगेटरमध्ये क्षमता आधारित शिक्षणाची संरचना केलेली आहे. ती आपण समजून घेवूया-
लर्निंग नॅव्हिगेटरमध्ये क्षमता आधारित शिक्षणाची संरचना केलेली आहे. ती आपण समजून घेवूया-
इयत्ता १ ते ५ चा विचार केल्यास गणित विषयाच्या अभ्यासक्रमात एकूण ८२ अध्ययन निष्पत्ती आहेत. या अध्ययन निष्पत्ती बाबत मुलांची प्रगती तपासण्यासाठी, त्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी त्यांच्यातील क्षमता ओळखून पहिली ते पाचवीच्या ‘क्षमतांची संरचना’ तयार केलेली आहे. लर्निंग नॅव्हिगेटर प्रत्येक विषय हा अध्ययन क्षेत्रांमध्ये विभागलेला असून प्रत्येक अध्ययन क्षेत्राचे पुढे ‘Topics’ मध्ये भाग पाडलेले आपल्याला दिसतील. या ‘Topics’ नुसार क्षमतांची आणि सूक्ष्म क्षमतांची मांडणी केलेली आहे. जसे की येथे गणित विषय ७ क्षेत्रात विभागलेला असून त्यात १२० क्षमता आणि ३६४ सूक्ष्म क्षमता काढण्यात आल्या आहेत. थोडक्यात याचा क्रम खालील प्रमाणे दाखवता येऊ शकतो:
विषय < अध्ययन क्षेत्र < घटक < क्षमता < सूक्ष्म क्षमता
या क्षमतांच्या संरचनेवर आधारित लर्निंग नेव्हिगेटरचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यातील संसाधने शिक्षकास सहजतेने पाहता यावीत, यासाठी अध्ययन क्षेत्र ही Unit स्वरुपात मांडलेले आहेत. प्रत्येक Unit मध्ये क्षमता निहाय पाठ आहेत. यात मुलास या क्षमतांमध्ये प्रभुत्व प्राप्त व्हावे यासाठी संसाधने उपलब्ध करून करून दिली आहेत. ही संसाधने ही सूक्ष्म-क्षमतांशी जोडलेली आहेत.सोबतच या पाठामध्ये त्या त्या क्षमतेसाठीचे मूल्यमापनही उपलब्ध असून प्रत्येक मूल्यमापनात त्या क्षमतेच्या प्रत्येक सूक्ष्म क्षमतेनुसार प्रश्न विचारले जातात.
क्षमतानिहाय मुलांची प्रगती:
क्षमतांच्या या संरचनेच्या आधारावर स्काय लाईनच्या स्वरूपात मुलांची नॅव्हिगेटरवरील विषयातील प्रगती आपल्याला पाहता येते.
सोबत दिलेल्या आलेखात इयत्ता १ ते १० ची गणित विषयाची संरचना दिसत आहे. हा आलेख इयत्ता तिसरीच्या मुलाचा आहे. यामध्ये प्रत्येक उभी बिल्डिंग म्हणजे एक अध्ययन क्षेत्र आहे. या बिल्डिंगमधील छोटे-छोटे चौकोन ह्या क्षमता आहेत. काळ्या रंगात दाखवलेल्या क्षमता ह्या इयत्ता पाचवीच्या पुढील वर्गांच्या आहेत. त्या १ ते ५ च्या क्षमता ह्या एकूण ७ अध्ययन क्षेत्रात विभागल्या आहेत. हिरव्या रंगाची रेषा ही तिसरीच्या वर्गाची इयत्ता रेषा आहे. पांढरीरेषा ही अध्ययन क्षेत्रानुसार मुलाचा स्तर (Location) दाखवते. हा आलेख आपण विस्तृत करून पाहू शकतो.
या विस्तृत आलेखात आपण कोणत्याही क्षमतेवर क्लिक करून, ती क्षमता कोणती आहे, त्या क्षमतेच्या सूक्ष्म क्षमता कोणत्या आहेत ते पाहू शकतो. वरील आलेखात उदाहरण म्हणून अध्ययन क्षेत्र १० मधील क्रमांक ७ ची क्षमता निवडली आहे. क्षमता निवडल्यावर उजव्या बाजूला आपण पाहू शकतो की ती नेमकी क्षमता कोणती आहे. आणि त्याखाली असणाऱ्या metadata या पर्यायात त्या क्षमतेच्या सर्व सूक्ष्म क्षमता पाहायला येतात. अशा पद्धतीने लर्निग नेव्हिगेटर मधील असणारा क्षमता आराखडा (competency framework ) आपण पाहू शकतो.
0 Comments